ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / गारठा वाढला, पुण्याचे किमान तापमान 11.4 अंश

गारठा वाढला, पुण्याचे किमान तापमान 11.4 अंश

पिंपरी: गुलाबी थंडी आता हळूहळू गोठवणा-या थंडीकडे वळत आहे. पुण्याचे आज (सोमवार) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 11.4 अंश इतके किमान तापमान नोंदवले गेले आहे.  तर पुण्याचे कालचे तापमान 11.5 अंश इतके होते. नाशिकचे सर्वात कमी किमान तापमान 10.4 अंश इतके नोंदवले आहे.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार तापमानात -3.2 अंश सेल्सिअस इतका फरक पडला आहे. तर लोहगावचे किमान तापमान 13.0 अंश सेल्सिअस इतके नोंदवले असून त्यात -2 अंशाचा फरक पडला आहे. पारा खाली उतरल्याने थंडीने शहरात चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, राज्यात पारा आणखी खाली जाईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Check Also

महाराष्ट्र भाजपा के 23 प्रत्याशियों का ऐलान,5 सांसदों का पत्ता कटा

मुंबई-महाराष्ट्र में 19 अप्रैल से 20 मई तक पांच चरणों में लोकसभा चुनाव होंगे। बीजेपी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *