ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / महापालिकांमध्ये महिनाभरात शिक्षण समिती स्थापन करणार – विनोद तावडे

महापालिकांमध्ये महिनाभरात शिक्षण समिती स्थापन करणार – विनोद तावडे

पुणे। (PNE)- येत्या महिनाभरात सर्व महापालिकेत शिक्षणसमिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेच्या जुन्या शिक्षण मंडळातील गैरव्यवहाराच्या घटना सातत्याने उघडकीस आल्याने मंडळाच्या कारभारावर सर्वच स्तरांतून टीका झाली. त्यामुळे शिक्षण मंडळ कामकाजाबाबत स्वतंत्र कायदा करण्याचा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिला. त्यानंतर मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर करून महापालिकेच्या पातळीवर नवा शिक्षण विभाग सुरू करण्याची सूचना राज्य सरकारने केली. त्यानुसार शिक्षण विभाग स्थापन करण्यात आले आहेत.

मात्र, नव्या विभागाच्या कामकाजासाठी राजकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती असेल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. त्यातच महापालिकेत बहुमत मिळाल्याने या समितीवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहणार असल्याने राजकीय सदस्यांची समिती स्थापन करण्याचे भाजपकडून निश्‍चित करण्यात आले होते. त्यामुळे निवडणुकीतील नाराज मंडळींच्या पदरात समितीचे सदस्यपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा भाजपसह अन्य राजकीय पक्षांचा प्रयत्न होणार आहे.

Check Also

महाराष्ट्र भाजपा के 23 प्रत्याशियों का ऐलान,5 सांसदों का पत्ता कटा

मुंबई-महाराष्ट्र में 19 अप्रैल से 20 मई तक पांच चरणों में लोकसभा चुनाव होंगे। बीजेपी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *