ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / पुण्यात ब्रिटीशकालीन पुलाला 187 वर्षे पूर्ण होऊन देखील भक्कम

पुण्यात ब्रिटीशकालीन पुलाला 187 वर्षे पूर्ण होऊन देखील भक्कम

पुणे। (PNE)- शहरातून वाहणार्‍या मुळा- मुठा नद्यांवर एकूण 31 पूल असून त्यातील 7 पूल हे ब्रिटीशकालीन आहेत. महापालिकेने सन 2013-14 मध्ये खासगी संस्थेकडून या सर्व पुलांचा भक्कमपणा शास्त्रीय आधारावर तपासून घेतला. संस्थेने दिलेल्या अहवालामध्ये ब्रिटीशकालीन पूल अजून भरभक्कम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वेलस्ली पुलास 187 वर्षे तर संभाजी पुलास 177 वर्षे पूर्ण झाली आहेत.

मुळा आणि मुठा नदींवर श्री छत्रपती राजाराम, हुतात्मा रवींद्र म्हात्रे, एस. एम. जोशी, यशवंतराव चव्हाण, छत्रपती संभाजी, काकासाहेब गाडगीळ (झेड पूल), कै. बाबाराव भिडे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, जयवंतराव टिळक, छत्रपती शिवाजी, त्रिंबकजी डेंगळे, जुना संगम, नवीन संगम, वेलस्ली, महादजी शिंदे, राजीव गांधी, स्पायसर कॉलेज, वि. भा. पाटील, जुना हॅरीस, नवीन हॅरीस, होळकर जुना, संगमवाडी, बंडगार्डन (जुना), बंडगार्डन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू, आगाखान, मुंढवा, मुंढवा (नवीन), वारजे हायवे यांसह एकूण 31 पूल आहेत. या पुलांमुळे पुण्याची ओळख पुलांचे शहर म्हणून निर्माण झाली आहे. यामध्ये 7 पूल ब्रिटीशकालीन आहेत.

ब्रिटीशकालीन पूल दीड शतक ओलांडूनही अजून भरभक्कम आहेत. शहरातील वेलस्ली पुलास 187 वर्षे तर संभाजी पुलास 177 वर्षे झाली आहेत. त्याशिवाय शंभरी झालेले 3 पूल शहरात आहेत. बंडगार्डनचा पूल 150 वर्षांपेक्षा जूना आहे. त्याची अवस्था मात्र अवजड वाहतूकीमुळे थोडी नाजूक झाल्याने तो वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. जुन्या संगम पुलास 160 वर्षे, जुना हॅरीस 122 वर्षे तर छत्रपती शिवाजी 94 वर्षे झाली आहेत. ब्रिटीशकालीन पुलांची अवस्था नव्याने झालेल्या पुलापेक्षाही भक्कम आहे. महापालिकेने खासगी कंपनीकडून या पुलांच्या करून घेतलेल्या तपासणीत हे निदर्शनास आले असून होळकर पूलाचे दप्तर महापालिकेच्या जुन्या कागदपत्रात सापडत नाही. दोन्ही नद्यांवर असलेल्या 31 पुलापैकी 25 वर्षापेक्षा जास्त जुन्या 18 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले, त्यात 7 पुलांच्या कामाबाबत शंका व्यक्त करण्यात आल्या असून सुधारणा सुचवण्यात आली होती. अंदाजपत्रकीय तरतूदीनुसार प्राधान्यप्रमाणे उर्वरीत पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येणार आहे.

Check Also

महाराष्ट्र भाजपा के 23 प्रत्याशियों का ऐलान,5 सांसदों का पत्ता कटा

मुंबई-महाराष्ट्र में 19 अप्रैल से 20 मई तक पांच चरणों में लोकसभा चुनाव होंगे। बीजेपी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *