ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / धक्कादायक…पुणे शहरात डेंग्यूचे तब्बल चार हजार रुग्ण!

धक्कादायक…पुणे शहरात डेंग्यूचे तब्बल चार हजार रुग्ण!

पुणे। (PNE)- पावसाने यंदा मुक्काम वाढवल्याने पुण्याला डेंग्यूच्या डासांनी विळखा घातला असून शहरात तब्बल चार हजार डेंगीचे रुग्ण असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. शहरातील कसबा पेठ, विश्राबागवाडा, येरवडा, शिवाजीनगर, धानोरी, ढोले पाटील रस्ता, हडपसर मुंढवा या भागात डेंग्यूच्या डासांनी थैमान घातले असून या परिसरातील नागरिकांना डेंग्यूची सर्वाधिक लागण झाली आहे.
शहरातील विविध रुग्णालयात आतापर्यंत 1 हजार 58 डेंग्यूची लागण झालेले रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. जून महिन्यापासून शहरात डेंग्यूच्या डासांनी थैमान घातले असून ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास झाली. त्यामुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Check Also

महाराष्ट्र भाजपा के 23 प्रत्याशियों का ऐलान,5 सांसदों का पत्ता कटा

मुंबई-महाराष्ट्र में 19 अप्रैल से 20 मई तक पांच चरणों में लोकसभा चुनाव होंगे। बीजेपी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *