ताज़ा खबरे
Home / अन्तर्राष्ट्रीय / बराक ओबामांनी दिला मिशेल यांना खास संदेश…

बराक ओबामांनी दिला मिशेल यांना खास संदेश…

मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा या जोडीचं प्रत्येक अमेरिकन जनेतच्या मनात एक वेगळंच स्थान आहे. कठीण काळात किंवा अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्ये मिशेल, बराक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यामुळेच आदर्श जोडपं म्हणून अमेरिकन या जोडीकडे पाहतात. या जोडप्याने नुकतीच आपल्या सहजीवनाची २५ वर्षे पूर्ण केली.
३ ऑक्टोबर १९९२ मध्ये हे दोघंही विवाहबंधनात अडकले. ओबामांच्या प्रवासात मिशेल यांचा मोलाचा वाटा आहे. ओबामांनी राष्ट्राध्यक्षाच्या काळात जी काही आरोग्यविषयक धोरणे व कार्यक्रम आखले त्याची अंमलबजावणी अधिक चांगल्या प्रकारे कशी होईल, हे मिशेल ओबामांनी पाहिले.

लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त मिशेल यांनी आपला जुना फोटो शेअर केला. ‘लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणखी काही वर्षांनंतरदेखील तू माझा चांगला मित्र राहशील. मी ओळखत असलेलं तू सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्त्व आहे.’ असं लिहीत मिशेल यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

शारजाह में फंसे 169 यात्री पुणे पहुंचे

पुणे- कोरोना वायरस महामारी के कारण शारजाह में फंसे 169 यात्रियों को लेकर विशेष उड़ान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *