ताज़ा खबरे

…अन्‌ मुख्यमंत्र्यांनी बैलगाडा हाकला!

– राज्यातील बैलगाडा मालकांकडून मिरवणूक – आमदार महेश लांडगे झाले मुख्यमंत्र्याचे ‘सारथी’ पिंपरी- राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तमाम बैलगाडा मालक आणि शौकिनांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांची बैलगाड्यातून छोटी मिरवणुकही काढण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

पोलीस आयुक्तालयासाठी सरकार सकारात्मक!

– भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची माहिती – विधानसभा अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २० लाखांहून अधिक आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. परिणामी, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा ताण पोलिसांवर येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करावे, अशी आग्रही मागणी …

Read More »

दिरंगाई न करता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या- अजित पवार

मुंबई- मुंबईतून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद बुधवारी सकाळी विधानभवनात उमटलेले बघायला मिळाले. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून विधानसभेत गोंधळ झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झालेले बघायला मिळालं. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची नाही. आत्तापर्यंत शिस्तबद्ध मोर्चे निघाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुणीही राजकारण करू नये. मराठा …

Read More »

मराठा मोर्चाचे विधिमंडळात उमटले तीव्र पडसाद! राजदंड पळवण्याचा प्रयत्न

मुंबई- आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी आणि अन्य मागण्यांसाठी मुंबईत मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघालेला असताना विधिमंडळात या मोर्चाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. मोर्चाला सुरुवात होताच भाजपाचे आमदार मंत्रालयाजवळच्या आयनॉक्स थिएटरपासून घोषणाबाजी करत सभागृहात दाखल झाले. विधानभवनाच्या पाय-यांवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमने-सामने आले त्यावेळीही घोषणाबाजी झाली. विधिमंडळात …

Read More »

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापणार, मराठा महामोर्चा ‘इफेक्ट’

मुंबई: मराठा महामोर्चाचं भगवं वादळ मुंबईत धडकताच सरकार खडबडून जागं झालंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात येणार आहे. या समितीला कॅबिनेटचा दर्जा असल्याने समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेचीही गरज राहणार नाहीये. मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल राज्य मागास आयोगाला सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादाही घालून देण्यात येणार आहे. या मंत्रिमंडळ …

Read More »

विनाकारण आमची माथी भडकवू नका…

मुंबई : कोपर्डीतील आमच्या भगिनीवर बलात्कार झाल्यानंतर मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही कोपर्डीत आला होता. त्यावेळी द्रुतगती न्यायालयात हा खटला चालवून नराधमांना फाशी देण्याचे आश्‍वासन तुम्ही दिले होते त्याचे काय झाले साहेब ? आणखी कितीवर्षे न्यायाची प्रतीक्षा करायची असा सवाल मुंबईतील मराठा मोर्चासमोर बोलताना समाजातील मुलींनी केला. त्यावेळी लाखो मराठ्यांने डोळे क्षणभर पानावले …

Read More »

हा समारोपाचा मोर्चा नाही; ही तर सुरवात : निलेश राणे

मुंबई : मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी काढलेला आजचा मुंबईतील मोर्चा समारोपाचा नाही. ही तर सुरवात आहे, असे निलेश राणे यांनी मराठा महामोर्चात सांगितले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे; तसेच त्यांचे पुत्र निलेश आणि नितेश राणे आज मोर्चात सहभागी झाले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी निलेश राणे म्हणाले, …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होईल: दानवे

मुंबई : मराठा समाजाबाबत फडणवीस सरकार आज निश्‍चितपणे ठोस भूमिका घेईल. तशी आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. भाजप आणि सरकारचा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर पाठिंबाच आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणे आम्ही मताचे राजकारण करणार नाही अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतली. येथे पत्रकारांशी बोलताना …

Read More »

पवना जलवाहिनी प्रकल्प रद्द झाल्यानंतरच आंदोलन पूर्ण- आमदार बाळा भेगडे

मावळ: पवना जलवाहिनी प्रकल्प पूर्णपणे रद्द झाल्यानंतरच पवना बंद जलवाहिनी विरोधी आंदोलन पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प कायमचा बंद होण्यासाठी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, असे मावळ तालुक्याचे आमदार बाळा भेगडे म्हणाले. पवना बंद जलवाहिनीच्या विरोधात 9 ऑगस्ट 2011 साली पुकारलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबारात येळसे येथील कांताबाई ठाकर, शिवणे …

Read More »

शरद मोहोळ टोळीतील सराईत गुंडासह सात जणांना हिंजवडीमधून अटक

पुणे: दरोड्याचा तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने हिंजवडीमधून परिसरातून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये कुख्यात शरद मोहोळ टोळीतील सराईत गुन्हेगार उमेश वाघोलीकर याचा समावेश आहे. आरोपींकडून 5 पिस्तुल, 23 जिवंत काडतुसे, 2 कार, मोटारसायकली आणि घातक हत्त्यारे जप्त केली आहेत. एका उच्चपदस्थ व्यक्तीच्या खुनाची सुपारी घेतल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाल्याचे …

Read More »