ताज़ा खबरे
Home / पिंपरी / चिंचवड / पवना जलवाहिनी प्रकल्प रद्द झाल्यानंतरच आंदोलन पूर्ण- आमदार बाळा भेगडे

पवना जलवाहिनी प्रकल्प रद्द झाल्यानंतरच आंदोलन पूर्ण- आमदार बाळा भेगडे

मावळ: पवना जलवाहिनी प्रकल्प पूर्णपणे रद्द झाल्यानंतरच पवना बंद जलवाहिनी विरोधी आंदोलन पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प कायमचा बंद होण्यासाठी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, असे मावळ तालुक्याचे आमदार बाळा भेगडे म्हणाले. पवना बंद जलवाहिनीच्या विरोधात 9 ऑगस्ट 2011 साली पुकारलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबारात येळसे येथील कांताबाई ठाकर, शिवणे येथील मोरेश्वर साठे व सवडली येथील श्यामराव तुपे या तीन बळीराजांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेस आज (बुधवारी) सहा वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हुतात्म्यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त पवनानगर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भेगडे बोलत होते.

येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून क्रांतीज्योती मिरवणुकीचे सभास्थळी आगमन झाले. येळसे येथील श्रद्धांजली सभेला आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, शंकरराव शेलार, बाळासाहेब जांभूळकर, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, शिवसेनेचे भारत ठाकूर तसेच भास्करराव म्हाळसकर, तळेगावचे माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, उपसभापती शांताराम कदम, माजी सभापती एकनाथ टिळे, भाऊ गुंड, रवींद्र भेगडे, अविनाश बवरे, गणेश भेगडे आदी उपस्थित होते.

190 शेतकऱ्यांवरील जीवे मारण्याचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे मागे घेण्याबाबत क्रांतिकारक निर्णय घेतल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार व मंत्रीगटाच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले. 70 लाख नुकसान भरपाई भरण्याची मागणी होती पण एक रुपयाही भरणार नसून गोळीबारातील जखमींना, दिव्यांगांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार भेगडे यांनी सांगितले.

प्रास्ताविक संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर यांनी केले. सूत्रसंचालन विश्वनाथ जाधव यांनी केले.

Check Also

चाकण से युवक का अपहरण…हत्या…चाकण पुलिस हत्यारे को दवोचा

पिंपरी- 18 वर्षीय लड़के आदित्य युवराज भंगारे का मार्च में महालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *