ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / नारायण राणेंबाबत चर्चा करायला मोठा नेता नाही: महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

नारायण राणेंबाबत चर्चा करायला मोठा नेता नाही: महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा करतानाच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबाबत चर्चा करण्याइतपत मी मोठा नाही, अशी मार्मिक टिप्पणी करत पाटील यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी सुमारे दीडतास चर्चा झाली. विधानपरिषद पोटनिवडणुकीत नारायण राणे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम असल्याने भाजपने आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराला पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट असल्याचं म्हटलं जात होतं. ‘परंतु नारायण राणेंबाबत चर्चा करण्याइतपत मी मोठा नेता नाही, त्याबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील,’ असं पाटील म्हणाले.

इतरांच्या कामात ढवळाढवळ नाही

मी फक्त मला दिलेलं काम पार पाडतो, इतर कामात ढवळाढवळ करत नाही. उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री दोघेही पश्चिम महाराष्ट्राच्या दौरावर असल्याने एकाच विमानात जाऊ, अशी विनंती त्यांना केली. मात्र वेळ वेगळी असल्याने ते शक्य नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. ‘उद्धवजींचं कोल्हापुरातच काय अवघ्या महाराष्ट्रात नेहमीच स्वागत करु,’ असंही त्यांनी सांगितलं.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *