ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / विमानतळ पोलिसांनीच नाकारली “सनबर्न 11” कार्यक्रमाला परवानगी

विमानतळ पोलिसांनीच नाकारली “सनबर्न 11” कार्यक्रमाला परवानगी

पिंपरी: नगर रोडवरील वाघोली जकात नाक्यासमोरील महालक्ष्मी लॉन्समध्ये 28 ते 31 डिसेंबर दरम्यान होणा-या “सनबर्न 11” या कार्यक्रमाला विमानतळ पोलिसांनी परवानगी नाकारली. रोहन हवाल यांनी या कार्यक्रमाला परवानगी मिळावी यासाठी 10 नोव्हेंबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याचे प्रसिध्दीपत्रक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी जारी केले.
 या नियोजित कार्यक्रमाच्या जागेपासून नागरी व लष्करी विमानतळ हे 1 किमीच्या अंतरावर आहेत. शिवाय सतत विमानांची ये-जा सुरू असल्याने हा परिसर यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या कार्यक्रमामध्ये आकाशात लेझर लाईट सोडली जात असल्याने विमानांना विमानतळावर उतरताना अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे एअरपोर्ट ऑथरिटी सीआयएसएफ व एअरफोर्सने प्रतिबंधक क्षेत्र असल्यामुळे या कार्यक्रमास आक्षेप घेतला आहे. शिवाय या कार्यक्रमासाठी होणा-या गर्दीचा फायदा अतिरेकी संघटनाही घेऊ शकतात. आणि कार्यक्रमाच्या जागेपासून जवळच पुणे-नगर महामार्ग असल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. या सर्व कारणामुळे “सनबर्न 11” या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *