ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / कोथरुड कचरा डेपोची जागा पुणे मेट्रोला हस्तांतरित करण्याची मागणी

कोथरुड कचरा डेपोची जागा पुणे मेट्रोला हस्तांतरित करण्याची मागणी

पुणे : पुणे मेट्रोच्या स्टेशनसाठी कोथरुड येथील कचरा डेपोची जागा तर, शिवसृष्टीसाठी कोथरुड बीडीपीची जागा द्यावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे.
पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता मेट्रोचे काम वेळेत होणे आवश्यक आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर असून त्यास आणखी गती मिळण्यासाठी कचरा डेपोची जागा मेट्रोला त्वरित मिळणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात दोन महिन्यापूर्वी निर्णयही झाला होता. मात्र अद्याप त्या जागेचे हस्तांतरण पुणे मेट्रोला झालेले नाही. तसेच, कचरा डेपोच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या शिवसृष्टीसाठी कोथरुड येथीलच बीडीपीची जागा देण्यात यावी. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याकामी स्वत: जातीने लक्ष घालावे आणि महापालिका आयुक्तांना यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यास सूचना कराव्यात, असे खासदार काकडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
कचरा डेपोची जागा पुणे मेट्रोला व बीडीपीची जागा शिवसृष्टीला मिळाल्यास दोन्ही विकासकामे मार्गी लागतील. कोथरुडच्या व पर्यायाने पुण्याच्या वैभवात त्याने भरच पडणार असल्याचेही खासदार काकडे यांनी नमूद केले आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *