ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / रावेत येथे पाण्याची पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाणी वाया

रावेत येथे पाण्याची पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाणी वाया

पिंपरी। रावेत येथील एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने पाईलपाईन फुटली असून एमआयडीसीचे अधिकारी दुरुस्तीचे काम करत आहेत.

रावेत, शिंदे वस्ती येथील कृष्ण मंदिराच्या पाठीमागे एमआयडीसीची पाण्याची पाईपलाईन आहे. आज (गुरुवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हॉल्व नादुरुस्त झाल्याने ही पाण्याची पाईपलाईन फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. एमआयडीसीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वॉल दुरुस्तीचे काम सुरु आहे.

सध्या शहरात पाण्याची टंचाई आहे. शहराच्या विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *