ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / प्राधिकरणाची अवैध बांधकामे नियमीतकरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरु

प्राधिकरणाची अवैध बांधकामे नियमीतकरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरु

पिंपरी।चालू बाजारभाव आणि अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचे दंडाचे शुल्क आकारुन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत. प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अर्ज असणार आहेत. उद्या (शुक्रवार) पासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करताना मान्यताप्राप्त आर्किटेक्टमार्फत अर्ज करणे आवश्यक असणार असल्याची, माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी आज (गुरुवारी) पत्रकारपरिषदेत दिली. आवश्यक कादपत्रांसह कार्यालयात 15 मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अर्ज स्वीकारण्यासाठी आकुर्डी येथील प्राधिकरणाच्या कार्यालयात स्वंतत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन नागरिकांनी त्यावर घरे बांधली आहेत. त्यामुळे प्राधिकरण जमिनीचा बाजारमूल्यानुसार दर आकारणार आहे. त्याचबरोबर विकास शुल्क असणार आहे. भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार प्राधिकरणातील भू- विभागाकडून आकारण्यात येणारे भूखंडाचे अधिमूल्य लागू असणार आहे. रहिवासीसह कमर्शिअल वापरासाठी रहिवासी दराच्या दीडपट दर, तर केवळ कमर्शिअलसाठी दोन पट दर लागू असणार आहेत, असे खडके यांनी सांगितले.
प्राधिकरणाकडे उपलब्ध कर्मचार्‍यांच्या साह्याने येथे काम पाहिले जाणार असून, गरज भासल्यास कंत्राटी स्वरूपात कर्मचारी घेण्यात येतील. प्राधिकरणाने 31 डिसेंबर 2015 पूर्वीचे उपग्रह छायाचित्र मागवले असून, संबंधित विभागाशी पत्रव्यवहार देखील केला आहे. अर्जदारांच्या जागेची मोजणी प्राधिकरण स्वतः करणार आहे. याचबरोबर वाढीव बांधकामे केलेल्या नागरिकांना देखील अर्ज करता येणार आहेत, असेही खडके यांनी स्पष्ट केले. परंतु, सर्व नियम पडताळून वाढीव बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत.
अर्जाच्या सोबत 31 डिसेंबर 2015 पूर्वीचा नोंदणीकृत भाडेकरार, महापालिका टॅक्स पावती, बांधकामाचे खरेदीखतबाबतच्या अभिलेखासोबतच आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, अधिवास, लाईट बिल, पाणी बिल आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक सहधारक असल्यास त्या भूखंडावरील सर्व सहधारकांना एकत्रित अर्ज करता येणार आहे, असेही खडके यांनी सांगितले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *