ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ‘डीएसके’सह तीन बिल्डरना सरकारचा दणका

‘डीएसके’सह तीन बिल्डरना सरकारचा दणका

मुंबई। रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीच्या डीएसके ग्रुप, भगतानी आणि टेम्पल रोझ ग्रुप या बांधकाम कंपन्यांना सरकारने मोठा दणका दिला आहे. ठरलेल्या वेळेत गृहप्रकल्पांतील घरांचा ताबा न दिल्याने या कंपन्यांच्या मालमत्तांची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
डीएसके ग्रुप, टेम्पल रोझ ग्रुप आणि भगतानी या बांधकाम विकसक कंपन्यांचे मुंबई आणि पुण्यात गृहप्रकल्प आहेत. अनेकांनी या प्रकल्पांमधील घरे खरेदी केली. मात्र, निर्धारित वेळेत या घरांचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे या विकसकांविरोधात ग्राहकांनी मुंबई, पुणे आणि ठाण्यातील पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यांच्या तक्रारींची दखल राज्य सरकारने घेतली आहे. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल, बुधवारी रात्री ग्राहक, मुंबई, पुणे आणि ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेतली. राज्य सरकारने या बांधकाम विकसकांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली. त्यावर तिन्ही कंपन्यांच्या मालमत्ता आणि व्यवहारांची चौकशी करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *