ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / भाजप नगरसेवकाला खंडणी मागितल्याप्रकरणी गुंड निलेश घायवळवर गुन्हा

भाजप नगरसेवकाला खंडणी मागितल्याप्रकरणी गुंड निलेश घायवळवर गुन्हा

पुणे। पुणे कॅन्टोनमेंट बोर्डच्या भाजप नगरसेवकाकडे 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारावर लष्कर पोलीस ठाण्यात काल (बुधवारी) रात्री गुन्हा दाखल झाला. भाजपच्या एका नगरसेवकाने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड निलेश घायवळ आणि त्यांच्या साथीदारांनी दरमहा 1 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यासाठी त्याला सतत धमकावण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी हा नगरसेवक कोरेगावपार्क येथील एका हॉटेलमध्ये येण्याची माहिती त्यांना मिळाली होती. यावेळी गुंड घायवळ हॉटेलमध्ये येऊन हॉटेल चालकाला धमकावून तोडफोड केली होती. घायवळच्या सतत येणा-या धमक्यांमुळे अखेरीस नगरसेवकाने काल बुधवारी रात्री पोलिसांकडे तक्रार दिली. तसेच हॉटेल तोडफोडी प्रकरणी हॉटेल चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी गजानन मारणे टोळीतील गुंड पप्पू कुडलेचा भाऊ सचिन कुडलेचा दांडेकर पूल भागात गोळीबार करून खून केला होता. या प्रकरणात त्यांना अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वीच तो जामीनावर सुटला होता. तसेच घायवळ व त्याच्या साथीदारांनी दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत पूर्ववैमनस्यातून लष्कर भागात भाजपचे नगरसेवक बबलू गवळी यांच्यावरही गोळीबार केला होता. मात्र, त्यातून ते सहीसलामत बचावले होते.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *