ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / पीएमपीच्या ठेकेदारांचे बस चालक संपाच्या तयारीत

पीएमपीच्या ठेकेदारांचे बस चालक संपाच्या तयारीत

पुणे। पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाला कंत्राटी पद्धतीने बस सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांचे बस चालक थकीत वेतनासाठी पुढील दोन दिवसात संपावर जाण्याची शक्यता आहे.
पीएमपीने सार्वजनिक वाहतुकीसाठी भाडेतत्वावर काही खासगी बसेस घेतल्या आहेत. या बसेसच्या ठेकेदारांनीच भाड्याची रक्कम गेल्या काही महिन्यापासून थकीत आहे. यामुळे ठेकेदारांकडून बस चालकांचे वेतन वेळेवर झालेले नाही. त्यामुळे पुढील 2 दिवसांत थकीत वेतन न मिळाल्यास खासगी ठेकेदाराचे हे बस चालक संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.
पीएमपीएमएलच्या सर्व बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे बस आता कुठे आहे, ती कुठल्या मार्गाने जात आहे, या शिवाय बसथांबेसुद्धा या यंत्रणेमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे बस ही बसथांब्यावर थांबली की नाही, हे सुद्धा आता समजू शकते. त्यासाठी बस थांब्याच्या काही अंतरावरील एरिया कव्हर करण्यात आला आहे. जर बस या अंतरावर थांबली, तर लगेच त्याबाबत समजू शकते.
त्यामुळेच बस बसथांब्यावर न थांबता तशीच गेली, तरीही समजू शकते. बस थांब्यावर प्रवाशी असो किंवा नसो बस ही थांब्यावर पाच सेकंद तरी थांबलीच पाहिजे, असा नियम आहे आणि हा नियम मोडल्यामुळे कोट्यवधींचा दंड ठेकेदारांना करण्यात येत आहे तर दुसरीकडे पीएमपीकडे थकीत असलेले रक्कम वेळेत मिळत नसल्याने ठेकेदार त्रस्त झाले आहेत.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *