ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / शाळेचे खोटे प्रमाणपत्र; भाजपचे नगसेवकतुषार कामठे यांना अखेर अटक

शाळेचे खोटे प्रमाणपत्र; भाजपचे नगसेवकतुषार कामठे यांना अखेर अटक

मुंबई। भाजपचे नगसेवक तुषार कामठे यांना आज (गुरुवारी) सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी तुषार कामठे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले होते. कामठे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. प्रभाग क्रमांक 26 मधील भाजपचे नगरसेवक तुषार गजानन कामठे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी  27 ऑक्टोबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल  केला होता. साठे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, पिंपळे निलख या प्रभागात मागास प्रवर्गातून 26 (ब) या उमेदवारीसाठी सचिन साठे यांनी अर्ज भरला होता. त्याच जागेसाठी तुषार कामठे यांनीही अर्ज भरला. यावेळी कामठे यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र, कामठे यांचे अकरावी उतीर्ण असलेले प्रमाणपत्रच खोटे असून  त्यांनी नापास असतानाही बारावीत प्रवेशासाठी खोटे प्रमाणपत्र सादर केले व तेच प्रमाणपत्र निवडणुकीतही सादर केले.
यानंतर कामठे यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यालयात दाद मागितली. मात्र, उच्च न्यालयानेही कामठे यांना लवकरात लवकर हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कामठे आज सांगवी पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *