ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / पद्मावती आधी प्रदर्शित तर होऊ द्या: मनसे

पद्मावती आधी प्रदर्शित तर होऊ द्या: मनसे

मुंबई। पद्मावती चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला विरोध करणं ही चुकीची बाब असल्याचे नमूद करत मनसेने या चित्रपटाबाबत सावध भूमिका घेतली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह भाग असल्यास त्याबाबत दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले.
पद्मावती चित्रपटाला राजपूतांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संघटनांनी तसेच काही राजकीय पक्षांनीही तीव्र विरोध केला आहे. कोर्टाकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला असला तरी या चित्रपटाला असलेला विरोध मावळलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनसेने मात्र चित्रपटाच्या बाजूने आपले मत नोंदवले आहे.
पद्मावती चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे एखादा चित्रपट प्रदर्शित झालेला नसताना आणि त्यात नेमकं काय दाखवण्यात आलं आहे, हे न पाहताच त्याला विरोध करणं योग्य नाही. त्यामुळे हा चित्रपट आधी प्रदर्शित होऊ द्या. त्यानंतर या चित्रपटात काही आक्षेपार्ह असल्यास त्याबाबत आम्ही संजय लीला भन्साळी यांच्याशी चर्चा करू. त्यावर योग्य असा तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल. केवळ विरोधासाठी विरोध करणं हे आम्हाला मान्य नाही. हा चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही, असेही खोपकर यांनी नमूद केले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *