ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / करिष्मा कपूर दुसरं लग्न करणार?

करिष्मा कपूर दुसरं लग्न करणार?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा आहे. सध्याचा तिचा प्रियकर व उद्योगपती संदीप तोषनीवाल यांच्यासोबत ती संसार थाटणार असल्याचं बोललं जातंय. करिष्माचे वडील, अभिनेते रणधीर कपूर यांनीही तिच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना करिष्मानं उद्योगपती संजय कपूर याच्याशी लग्न केलं होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात मतभेद झाले. प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं. अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर मागील वर्षी तिचा संजय कपूरशी रीतसर घटस्फोट झाला. त्यानंतर वर्षभरातच तिच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. करिष्माला संजय कपूरपासून दोन मुलं आहेत. करिष्माचा नवा प्रियकर संदीप तोषनीवालही घटस्फोटित आहे. त्यानं पत्नी अर्शिताला घटस्फोट दिला आहे.

रणधीर कपूर यांची हरकत नाही!

‘करिष्माला दुसरं लग्नं करायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही. तिला माझा आशीर्वाद आहे. मी संदीपला ओळखत नाही. फक्त त्याचा फोटो पाहिलाय. पण करिष्मा त्याला चांगलं ओळखते. तिला संदीप योग्य वाटत असेल माझाही तिला पूर्ण पाठिंबा आहे’, असं रणधीर कपूर यांनी म्हटलं आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *