ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / भक्त सैतानाचे नसतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कन्हैया कुमारची टीका

भक्त सैतानाचे नसतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कन्हैया कुमारची टीका

नाशिक।(PNE)- छात्रभारती संघटनेने नाशिक येथे आयोजित केलेल्या ‘संविधान जागर’ सभेत विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्लाबोल केला. यावेळी महागाईवर बोलत असताना कन्हैया कुमारने ‘मोदीभक्तांना’ भक्त मानण्यास नकार देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे सैनाताची उपमा दिली. ‘मला सांगा, महागाई वाढली आहे की नाही,’ असा सवाल करत कन्हैया कुमारने मोदी भक्तावर टीप्पणी केली. ‘महागाईचे चटके तुम्हाला जाणवतील, मात्र मोदी भक्तांना जाणवरणार नाहीत,’ असे म्हणत कन्हैया कुमारने भक्त या शब्दावरच आक्षेप नोंदवला. मोदी भक्तांना आपण भक्त मानत नाही, याचे कारण म्हणजे भक्त हे देवाचे असतात, सैतानाची भक्ती केली जाते का, असे सांगत कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदी यांना अप्रत्यक्षपणे सैतान संबोधले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवताना कन्हैया कुमारने ‘अच्छे दिन’, ‘नोटाबंदी’ आणि जीएसटीवर हल्ला चढवला. टॉमेटोचा भाव २०० रुपये प्रति किलो झाल्याचे सांगत त्याने महागाईच्या प्रश्नाला हात घातला. नोटाबंदीमुळे ३ लाख कोटी रुपये इतका काळा पैसा परत आला असेल तर मग बुलेट ट्रेनसाठी पंतप्रधान मोदी यांनी जपानकडून कर्ज का घेतलं असा सवाल करत कन्हैया कुमारने नोटाबंदीवर कडाडून हल्ला चढवला. जीएसटी हा केवळ छोटे आणि मध्यम व्यापारी, शेतकरी, कामगार आणि श्रमिकांना उध्वस्त करण्यासाठीच आणला गेला असेही कन्हैया कुमार म्हणाला.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *