ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन

गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन

पिंपरी। (PNE)- घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (शुक्रवारी) आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणा दिल्या.
पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महिला शहराध्याक्ष व नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, माजी नगरसेविका अनिता तापकीर, मंदा आल्हाट, शकुंतला भाट तसेच संगीत जाधव, पुष्पा शेळके, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा गंगा धेंडे, मिनाक्षी उंबरकर, सविता धुमाळ, पौर्णिमा पालेकर, देवी थोरात, शिला भोंडवे, दिपाली देशमुख, सुवर्णा काळभोर, नलिनी शेडगे, दिपाली गायकवाड, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रवक्ते फजल शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
एक नोव्हेंबरपासून विनाअनुदानित गॅस सिलेंडर 93 रुपयांनी महागला आहे. अनुदानित गॅस सिलेंडरचे दर 4.56 रुपयांनी वाढले आहेत. या वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
”विकास वेडा झाला…माझा संसार उद्धवस्त झाला”, ”बया…बया…..गॅस लय महागला”….”बया…बया….कसली ही महागाई”…अशा मजकूराचे फलक आंदोलक महिलांनी हातामध्ये घेतले होते. तसेच महागाई करणा-या सरकारचा धिक्कार असो…गॅस दरवाढ मागे घेतलीच पाहिजे…अशा घोषणा महिलांनी दिल्या.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *