ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / हिंदुस्थान पहिला हिंदुंचा देश त्यानंतर त्यावर अन्य धर्मियांचा हक्क : शिवसेना

हिंदुस्थान पहिला हिंदुंचा देश त्यानंतर त्यावर अन्य धर्मियांचा हक्क : शिवसेना

मुंबई। हिंदुस्थान आधी हिंदुंचा देश असून त्यानंतर त्यावर अन्य धर्मियांचा हक्क असल्याचे मत शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनातून व्यक्त केले आहे. सरसंघचालकांनी हा देश हिंदुप्रमाणे अन्य धर्मियांचा असल्याचे मत व्यक्त केल्यावर शिवसेनेने यावर आपली भूमिका मांडली आहे.
 अन्य धर्मियांनाही हिंदू राष्ट्रावर निष्ठा ठेवावी लागेल
– पाकिस्तानाची निर्मिती धर्माच्या नावावर झाली. त्यामुळे हिंदुस्तान हा हिंदुंचा आहे. मात्र या देशात अन्य धर्माचे नागिरकही राहु शकतात. त्यांना आपल्या धर्माचे पालन करतानाच देशावर निष्ठा ठेवावी लागेल.
– सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंदूर येथे 27 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थान हा हिंदुंचा असला तरी येथे अन्य धर्मीय नागरिकही राहु शकतात, असे मत व्यक्त केले आहे.
 सरकार राम मंदिर बनविण्यास तयार नाही
– जगभरात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. पाकिस्तानात मुस्लिम तर चीन, जपान, श्रीलंका आणि म्यानमारमध्ये बौध्द लोक राहतात. अमेरिका आणि युरोपात ख्रिस्ती लोक राहतात.
– जगभरात हिंदूंसाठी दुसरा कोणताही देश नाही. हिंदुस्थान हा एकमेव देश हिंदूंसाठी आहे.
– हिंदुस्थानात आज हिंदुत्ववादी विचारसरणीचे सरकार आहे. तरीही ते अयोध्येत राम मंदिर उभारण्यास तयार नाही.
 काश्मिरी पंडितांची घरवापसी कधी?
– हिंदुत्ववादी सरकार बनल्यावर देखील काश्मिरमध्ये पंडितांची घरवापसी होऊ शकलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही सार्वजनिक ठिकाणी वंदमातरम म्हटले जात नाही. आरएसएसने याबाबत सरकारला विचारले पाहिजे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *