ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / धुळे-सुरत महामार्गावर एसटी बसला कारची जोरदार धडक; एक जागीच ठार, 12 जखमी

धुळे-सुरत महामार्गावर एसटी बसला कारची जोरदार धडक; एक जागीच ठार, 12 जखमी

नवापूर- धुळे- सुरत महामार्गावरील घोळदे गावाजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एक जण ठार झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेली माहितीनुसार, घोळदे गावाजवळ समोरून येणार्‍या भरधार कारने धुळे-बडोदा एसटी बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बस समोर जावून रस्त्यावर उलटली. या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात बस व कारचे मोठे नुकसान झाले आहे.  महामार्गावरच बस उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कार चालक नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *