ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांचा विघातक शक्ती वापर करीत आहेत का ? – यशवंत भोसले

कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांचा विघातक शक्ती वापर करीत आहेत का ? – यशवंत भोसले

पिंपरी। (PNE) या देशाला दिशा देणारी तरुणांची फळी उभी राहणे गरजेचे आहे. कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांच्यासारखे तरुण आंदोलनातून कन्हैया कुमार व हार्दिक पटेल सारखे तरुण समाजासमोर येत आहेत. मात्र, कन्हैया कुमार व हार्दिक पटेल या तरुण शक्तीचा वापर विघातक शक्ती तर करत नाहीत ना, असा सवाल राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंत भोसले यांनी आळंदी येथील कामगरांच्या मेळाव्यात बोलताना उपस्थित केला.

आळंदी येथील विठ्ठल मंगल कार्यालय येथे आज (रविवारी) सकाळी अकरा वाजता मरकळ एमआयडीसी व आळंदी परिसरातील कामगारांच्या मेळाव्याचे कामगार नेते यशवंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोसले बोलत होते. या मेळाव्यास जयदेव अक्कलकोटे, दिनेश पाटील, दिपक पाटील, अमोल घोरपडे, विशाल ढोरे आदी संघटनांचे कार्यकारीणी सदस्य व शेकडो कामगार उपस्थित होते.
भोसले म्हणाले की, देशात शेतकरी, विद्यार्थी, श्रमिकांचे एवढे प्रश्न असताना वेगळ्याच विषयावर झगडत आहेत. परंतू दुर्दैवाने जे प्रश्न हे दोघे उचलत आहेत ते तरुणांना वेगळी दिशा देणारे आहेत. जे की आपल्या देशाच्या हिताचे नाहीत. त्यामुळे त्यांच्या गुणांचा, शक्तीचा विघातक शक्ती तर वापर करत नाहीत ना अशी शंका येतेय. कारण पटेल ज्या आरक्षणासाठी झगडत आहे तिथे जर तरुणांना कायमस्वरुपी नोक-याच नसतील तर या आरक्षणाचा काय फायदा, असा सवालही भोसले यांनी उपस्थित केला.
आज 80 टक्के तरुण हे कंत्राटी कामगार म्हणूनच काम करत आहेत. मात्र, शासनाने कामगाराबाबतचे धोरण बदलावे. भूमिपुत्रांना व श्रमिकांना कायमस्वरुपी नोक-या मिळायला हव्यात, कायदेही कामगारांच्या हिताचे व त्यांच्या संरक्षणाचे असायला हवेत, तसेच शेतकरी व श्रमिकांना 60 वर्षानंतर पेनशन मिळावे या सा-या मागण्यांबाबात कामगारांमध्ये जागृती व्हावी व त्यांनी एकत्र यावे यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडी राज्यव्यापी मोहीम राबविणार आहे. यासाठीच आळंदी येथील आजचा मेळावा हा शुभरंभाचा मेळावा आहे, असेही कामगार नेते  भोसले यांनी सांगितले.
या मेळाव्याचे संयोजन एम.डी. पडवळ, आर.एम. बुर्डे, सलिम शेख, जी.आर. कुंभारे, एस.एस. कदम, पी.बी. झुझम, ए.बी. चव्हाण यांनी केले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *