ताज़ा खबरे

पिंपरी – दिवाळीची सुट्टी संपत आली असून सोमवारपासून बहुतेक शाळा सुरू होत आहेत. सुट्टी एवढ्या लवकर कशी संपली अशी खंत बाळगत चिमुकल्यांनी पुन्हा शाळेत जाण्याची तयारी सुरू केली आहे. 15 ते 20 दिवसांच्या सुट्टीनंतर आता सोमवारपासून पुन्हा शाळेची घंटा खणखणू लागणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमुळे आलेली थोडी मरगळ झटकायला आता शिक्षकांना आणि आई बाबांनाही वेळ लागणार. बऱ्याच जणांनी एसटीचा संप मिटल्यानंतर गावाकडचा रस्ता धरला होता. आता शाळा सुरू होत असल्याने परतीचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बस स्थानकांवर गावाकडून परतणाऱ्या मुलांची आणि पालकांची गर्दी दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका व खासगी मिळून सुमारे 600 हून अधिक शाळा आहेत. तसेच नर्सरी व बालवाड्यांची संख्याही 300 हून अधिक आहे. शहरातील विद्यार्थी संख्या देखील खूप जास्त आहे. वर्गखोल्यांवर चढलेली धूळ साफ करून विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार आहे. काही शाळांमध्ये दिवाळीनंतर विद्यार्थ्यांचे वेलकम करण्याची जोरात तयारी सुरू आहे. बऱ्याच शाळांचा झालेल्या प्रथमसत्र परीक्षेचा निकाल देखील दिवाळीनंतर लागणार आहे. त्यामुळे त्या निकालाची उत्सुकता आणि धाकधूक देखील विद्यार्थ्यांना लागली आहे. बरीच मंडळी शाळेच्या पहिल्या दिवशी दांडी मारणार असली तरी निकालाच्या उत्सुकतेपोटी हजेरी लावतात. तर बऱ्याच जणांनी अजून दोन दिवस उशिरा शाळेत जाण्याचे नियोजन केले आहे. दिवाळी मजा करण्यात, खेळण्यात आणि बागडण्यात गेली असल्याने काही मुलांचे गृहपाठ अजून बाकी आहेत. मुले गृहपाठ पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. खासगी शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांचे पेपर तपासणीचे काम सुरू होते. त्यामुळे शिक्षकांना प्रथम सत्राचे पेपर तपासण्याचीही धास्ती होती. विद्यार्थी पहिल्याच दिवशी उत्सुकतेपोटी निकालाबद्‌दल विचारतात. गृहपाठाच्या वहीला देखील गुण असल्यामुळे त्यातही बाजी कोण मारणार, याची चढाओढ असते.

सुट्यांसाठी गेलेल्या बालचमूचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दिवाळीची सुट्टी संपल्याची खंत तर असते पण त्याहून अधिक मित्रांना बऱ्याच दिवसांनी पुन्हा भेटण्याचा आनंद ही असतो. दिवाळीच्या सुट्टीत घेतलेले नवीन कपडे, भेटवस्तू याबद्‌दल मित्रांना सांगायचे असते. फराळ आणि फटाक्‍यांचे वर्णन ही करायचे असते तर काही जण सहलीला तर काही कला शिबिरांना जातात त्याबद्‌दल आपल्या मित्रांना भरभरुन माहिती देण्यासाठी चिमुकले उत्सुक आहेत. दिवाळीनंतर शाळांमध्ये गॅदरिंग आणि खेळ स्पर्धा होतात. बच्चे कंपनी याची तयारी करण्यासाठी आणि त्याबाबत आपल्या मित्रांसोबत चर्चा करण्यासाठी देखील उत्सुक असते.

Check Also

चाकण से युवक का अपहरण…हत्या…चाकण पुलिस हत्यारे को दवोचा

पिंपरी- 18 वर्षीय लड़के आदित्य युवराज भंगारे का मार्च में महालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *