ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / हिमाचल प्रदेशमध्ये देशाचा ‘हा’ पहिला मतदार यंदाही करणार मतदान

हिमाचल प्रदेशमध्ये देशाचा ‘हा’ पहिला मतदार यंदाही करणार मतदान

शिमला : भारताच्या पहिल्या मतदाराच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाने विशेष तयारी केली आहे. श्याम शरण नेगी असं या मतदाराचं नाव आहे. हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये नेगी मतदान करणार आहेत. त्यांचे वय आता १०० वर्षांचे झाले आहे. त्यांना चालता-फिरताही येत नाही.

नेगींसाठी प्रशासनाने एका विशेष गाडीची व्यवस्था केली आहे. या गाडीने नेगी यांना पोलिंग बुथवर नेण्यात येणार आहे. पोलिंग बुथवर त्यांचे विशेष स्वागत केले जाणार आहे. २०१४ च्या निवडणुकांदरम्यान गुगलने नेगी यांचा एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओत नेगी यांनी आपल्या पहिल्या वोटिंगची कहाणी सांगितली आहे. या व्हिडिओनंतर नेगी यांना प्रसिद्धी मिळाली.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा निवडणुका व्हायच्या होत्या, तेव्हा हिमाचल प्रदेशात हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी लक्षात घेऊन तिथे निवडणुका आधी घेण्यात आल्या. अन्य राज्यांत १९५२ च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात निवडणुका झाल्या. हिमाचल प्रदेशातल्या मंडी क्षेत्रात २५ ऑक्टोबर १९७५ रोजी झालेल्या निवडणुकीत नेगी हे मतदानाचा हक्क बजावणारे पहिले भारतीय ठरले. त्यावेळी नेगी शिक्षक होते. ते १९७५ मध्ये निवृत्त झाले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *