ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / खादी फॉर नेशननंतर आता खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे युग: नरेंद्र मोदी

खादी फॉर नेशननंतर आता खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे युग: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली –नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात 37व्या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोदींनी म्हटले, या वेळी दीपावलीला खादीची रेकॉर्ड विक्री झाली. अगोदर खादी फॅशन मग खादी फॉर नेशन होते, आता खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे युग येत आहे. तथापि, पीएमनी ऑक्टोबर 2014 पासून देशातील जनतेसमोर आपले विचार मांडण्यासाठी ‘मन की बात’ची सुरुवात केली होती.
1. सर्वात जास्त नियमाने साजरा केला जाणारा सण आहे छठ.
2. आता खादीच्या ट्रान्सफॉर्मेशनचे युग
– मोदी म्हणाले, दिवाळीला दिल्लीच्या एका खादी हँडलूम स्टोअरवर 1 कोटी 20 लाखची विक्रमी विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे. हे आनंदाची बाब आहे. खादीच्या विक्रीत एका वर्षात 90 टक्के वाढ झाली आहे.
– अगोदर खादी फॅशन मग खादी फॉर नेशन, आता खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे युग येत आहे.
3. जवानांची गौरवगाथा ऐकली पाहिजे…
– या वेळी गुरेज सेक्टरमध्ये दिवाळी साजरी करणे माझ्यासाठी अविस्मरणीय ठरले. जेव्हा संधी मिळेल आपण जवानांची गौरवगाथा ऐकली पाहिजे.
4. वसुधैव कुटुंबकम आपली परंपरा
– मोदी म्हणाल, आपण वसुधैव कुटुंबकमची परंपरा पाळणारे आहोत. यूएन अंब्रेला अंतर्गत भारताने शांती रक्षा मिशनमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. 18,000 हून अधिक भारतीय सैनिकांनी यूएन पीस कीपिंगमध्ये योगदान दिले आहे. पीस कीपिंग ऑपरेशन सोपे नाही. वेगवेगळ्या परिस्थितीनुरूप जवानांना स्वत:ला बदलावे लागते.
5. भगिनी निवेदिता यांनी भारतासाठी स्वत:ला समर्पित केले…
– आपली पुण्यभूमी अशा व्यक्तींनी भरलेली आहे. भगिनी निवेदिता या आयर्लंडमध्ये जन्मल्या, स्वामी विवेकानंदांनी त्यांना निवेदिता नाव दिले. याचा अर्थ म्हणजे, जी पूर्णपणे समर्पित आहे. त्यांनी ते सिद्ध केले. त्यांनी गरिबांच्या सेवेत स्वत:ला समर्पित केले. काल त्यांची 150वी पुण्यतिथी होती. भगिनी निवेदिता यांनी भारतीय संस्कृतीच्या गौरवाची पुनर्स्थापना केली.
6. बालकांनाही डायबिटीज होत आहे…
– लहान मुलेही डायबिटीजने ग्रस्त होत असल्याचे पाहून मोठे आश्चर्य होते. अगोदर याला श्रीमंतांचा आजार म्हटले जायचे. हा ऐषारामात राहणाऱ्यांचा रोग होता. परंतु आता तरुण वयातही हा रोग होतोय. याचे कारण आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्यात बदल हे आहे. माझा सल्ला आहे की, कुटुंबातील मुलांना मोकळ्या मैदानात खेळण्याची आणि डिनरनंतर थोडे चालण्याची सवय लावावी.
7. खेळाडूंनीही नाव मोठे केले
– मोदी म्हणाले, क्रीडा क्षेत्रातूनही चांगल्या बातम्या आल्या. भारताने हॉकी एशिया कप जिंकला. 10 वर्षांनी चॅम्पियन बनला. टीमला माझ्याकडून तसेच देशाकडून शुभेच्छा. किदांबी श्रीकांतने डेन्मार्क ओपन किताब जिंकून प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल अशी कामगिरी केली. त्यांनाही शुभेच्छा.
– फिफा अंडर 19 मध्ये जगभरातून संघ आले होते. मी या खेळाडूंमधील ऊर्जा पाहून प्रभावित झालो. भारताने भलेही या खेळात किताब जिंकला नसेल, परंतु देशवासीयांची मने जिंकली.
8. स्वच्छतेवर लोक सातत्याने मला लिहितात..
– स्वच्छ भारताबद्दल मला लोक जेवढे लिहितात त्यावर विचार केल्यास मला दररोज मन की बात मांडावी लागेल. काही दिवसांपूर्वी मला एक रिपोर्ट मिळाली. यात सांगितले गेले की, महाराष्ट्राच्या चंद्रपूर किल्ल्यात एका एनजीओने 200 दिवस चालवलेल्या स्वच्छता अभियानाद्वारे येथील किल्ल्याची स्वच्छता केली. फोटोज पाहून मी चकित झालो.
9. गुरुनानकांनी अनेक बाबी शिकवल्या…
– 4 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती साजरी केली जाईल. ते जगद्गुरू आहेत. त्यांनी सर्व जातींना एक असल्याचे सांगितले. महिला सबलीकरणाला महत्त्वाचे स्थान दिले. लंगरमधून एकता आणि समानता दाखवली. आपण त्यांचे 550 वे प्रकाशपर्व साजरे करणार आहोत. त्यांनी शिकवण दिली की, परमात्म्याचे नाम जपा, मेहनत करा आणि गरजूंची मदत करा.
10. पटेलांनी देशाला एका सूत्रात गुंफले
– 31 ऑक्टोबरला सरदार पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधींची पुण्यतिथी आहे. पटेल यांनी भारताला एका सूत्रात गुंफण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या निर्णयक्षमतेने देशाला सर्व बाधा दूर करण्याची ताकद दिली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *