ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / शरद पवार यांचा गौप्यस्फोट…तर राम मंदिराचा प्रश्न सुटला असता!

शरद पवार यांचा गौप्यस्फोट…तर राम मंदिराचा प्रश्न सुटला असता!

मुंबई। (PNE)- अयोध्यातील राम मंदिराचा तिढा 1991 साली सुटण्याच्या मार्गावर होता. राम जन्मभूमी न्यासाचे प्रतिनिधी आणि बाबरी मशिद कृती समितीच्या प्रतिनिधींचे या वादाबाबत एकमत झाले होते. प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असतानाच केंद्रातील चंद्रशेखर यांचे सरकार कोसळले आणि पुढे हा प्रश्न तसाच रेंगाळत राहिला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
शरद पवार यांनी मोजक्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये याबाबतचा गौप्यस्फोट करत 90 च्या दशकात देशात गाजलेल्या राम-मंदिर आणि बाबरी मशिद वादाशी संबंधित अनेक मुद्यांवर भाष्य केले.
1990 साली चंद्रशेखर यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. व्ही.पी. सिंग यांचे सरकार गडगडल्यानंतर राजीव गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसने चंद्रशेखर यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्याकाळात राम मंदिर-बाबरीचा विषय गाजत होता. त्यामुळे चंद्रशेखर यांनी हा वाद निकालात निघावा यासाठी एक समिती तयार केली. या समितीत राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री भैरवसिंग शेखावत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने माझी नियुक्ती केली होती. माझ्याकडे राम जन्मभूमी न्यासाच्या प्रतिनिधींशी तर शेखावत यांच्याकडे बाबरी मशिद कृती समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची जबाबदारी होती, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
पवारांनी पुढे सांगितले की, त्या काळात दोन्ही बाजूंना एकत्र घेऊन अनेक बैठका पार पडल्या. त्यात वादग्रस्त जागा वगळून राम मंदिर आणि बाबरी मशिद बांधण्यास दोन्ही बाजूंची हरकत नव्हती. त्यावर वादग्रस्त जागेवर आम्ही एक स्मारक तयार करावे अशी सूचना मांडली. त्याला दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्या फॉर्म्यूल्यानुसार, वादग्रस्त जागा वगळून दोन तृतीअंश (अंदाजे 65 टक्के) जागा राम मंदिरासाठी तर एक तृतीअंश (35 टक्के) जागा बाबरी मशिदीसाठी देण्याचे निश्चित झाले होते. घुमटाच्या जागेबाबतही वाद होता, मात्र, ती जागा बाबरी मशिदीच्या भागात होती त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळाली. दोन्ही बाजू तडजोडीस तयार होताच आम्ही माहिती चंद्रशेखर यांच्या कानावर घातल्या. मात्र, पुढे त्यावर मार्ग काढण्याआधीच राजीव गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसने चंद्रशेखर यांच्या सरकारचा पाठिंबा काढला आणि सरकार गडगडले आणि चर्चा खंडित झाली. अशा प्रकारे देशातील महत्त्वाचा व वादाचा विषय सुटण्याच्या मार्गावर असताना तो तसाच रेगांळत पडला, असा गौप्यस्फोट पवारांनी केला.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *