ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / निरूपम यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही : मनसे

निरूपम यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही : मनसे

मुंबई : मालाड रेल्वे स्थाकनाजवळ मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आपल्या कार्यकर्त्यांसह आले असता फेरीवाल्यांनी त्यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

या हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले, की संजय निरूपम यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही. निरुपम हेच फेरीवाल्यांकडून हफ्तेखोरी करत आहेत. आता फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होणार असून निरुपम यांना चांगलाच धडा शिकवू.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात फेरीवाल्यांना मुंबई कॉंगेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी चिथवल्यामुळे मनसे कार्यकर्ते मालाड रेल्वे स्थानकाबाहेर निषेध व्यक्त करण्यासाठी आज शनिवारी जमा झाले. मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आपल्या कार्यकर्त्यांसह मालाड स्थानकाबाहेर आले असता फेरीवाल्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. माळवदे मालाड स्थानकाबाहेर निषेध करण्यासाठी आपल्या करकर्त्यांसह गेले असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखून माळवदे यांना अटक केली. माळवदे यांना अटक आणि सुटका झाल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा ते स्थानकाबाहेर गेले. त्यावेळी फेरीवाल्यांच्या जमावाने माळवदे यांना जबर मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये माळवदे यांच्या डोक्‍याला व हाताला गंभीर दुखापत झाली.

या सगळ्याचा निषेध म्हणून पुन्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी मालाड स्थानकाबाहेर निषेध करण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलिस व मनसे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे समजते. पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सुशांत माळवदे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी मालाड, दादरसारख्या ठिकाणी फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड व नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईच्या सर्वच मुख्य स्थानकांबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

राज ठाकरे रविवारी माळवदेंना भेटणार 
सुशांत माळवदे यांना मालाड येथील एका रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: माळवदे यांना भेटण्यासाठी जाणार होते. मात्र, त्यांच्या विविध वैद्यकिय चाचण्या सुरु असल्याने राज ठाकरे उद्या माळवदे यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *