ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / आधारकार्ड नंबर न आणल्याने 10 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाकडून जबर मारहाण

आधारकार्ड नंबर न आणल्याने 10 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाकडून जबर मारहाण

पिंपरी। (PNE)- आधार कार्ड नंबर न आणल्याने शिक्षकाकडून 10 वर्षीय विद्यार्थ्याला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिंचवड येथील एम.एस.एस. शाळेत ही घटना घडली. या प्रकरणी 324 बाल न्याय/बाल संरक्षण क 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरात असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतून मुलांना आधारकार्ड नंबर घेऊन यायला सांगितले होते. मात्र एका विद्यार्थ्याने आधारकार्ड नंबर आणलाच नाही. याची जबरदस्त शिक्षा या विद्यार्थ्याला शिक्षकाने पायावर छडीने जबर मारहाण करून दिली. घरी गेल्यावर या मुलाने आपल्या आईला शिक्षकाकडून झालेल्या या मारहाणीबाबत सांगितल्यानंतर आईने तातडीने त्याला दवाखान्यात नेऊन उपचार केले. व चिंचवड पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी बाल संरक्षण हक्क कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून अद्याप शिक्षकाला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस याविषयी अधिक तपास करीत आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *