ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / जगताप डेअरीकडे येणा-या मार्गांवर वर्दळीच्यावेळी जड वाहनांना प्रवेश बंद

जगताप डेअरीकडे येणा-या मार्गांवर वर्दळीच्यावेळी जड वाहनांना प्रवेश बंद

पिंपरी। (पीएनई)- जगताप डेअरी येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. मात्र, या कामामुळे सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सांगवी वाहतूक पोलिसांनी सकाळी साडे सात ते साडेअकरा व सायंकाळी चार ते साडेनऊ या वर्दळीच्या वेळी जड वाहनांना बंदी केली आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, काळेवाडी फाटा ते जगताप डेअरी व कस्पटे वस्ती ते जगताप डेअरी या दोन मार्गावरुन बस, खासगी बस, ट्रक व इतर जड वाहनांना सकाळी सात ते साडेअकरा व सायंकाळी चार ते साडेनऊ या कालावधीत प्रवेश बंद असणार आहे. ही बंदी जगताप डेअरी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहे. यामध्ये शासकीय बस, रुग्णवाहिका व अग्निशामकदल अशा अतिआवश्यक सेवांना मात्र मुभा देण्यात आली आहे.

डांगे चौक, काळेवाडी फाटा या भागातून पुण्याकडे जाणा-या खासगी बसचे प्रमाण खूप आहे. त्यात जगताप डेअरी चौकात सध्या पुलाचे काम सुरु असल्यामुळे कार्यालयात जाताना व कार्यालयातून घरी परत येण्याच्या वेळेमध्ये मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी जड वाहनांना बंदी या भागात प्रवेशास बंदी केली आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *