ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशामुळे भाजपमध्ये अस्वस्थता

राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशामुळे भाजपमध्ये अस्वस्थता

मुंबई: राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपमधील निष्ठावान आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर सरकारने सारवासारवीचा प्रयत्न केला आहे.

भाजपात ज्यांची 3 री आणि 4 थी टर्म आहे ते आमदार यामुळे अस्वस्थ झाले आहेत. यात 7 प्रदीर्घ अनुभवी आमदार आहेत. तर काँग्रेस आणि एनसीपी मधून भाजपत आलेले आमदारही अस्वस्थ आहे. यात 15 दिग्गज आमदार आणि 4 माजी मंत्री देखील आहेत. जर शिवसेनेला टक्करच द्यायची असेल तर आशिष शेलार, अनिल गोटे का नको असाही प्रश्नही विचारला जातोय.

दरम्यान विस्तारात पंकजा मुंडे, बावनकुळे,गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश बापट यांच्यापैकी कुणाचं खातं कमी होणार ही भीतीही मंत्र्यांना सतावते आहे. पण सर्वांनी नो कॉमेंट्स अशी भूमिका घेतली आहे. या 10 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *