नवी दिल्ली : सर्वात श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत. फोर्ब्जनं भारतातल्या शंभर लक्ष्मीपुत्रांची यादी प्रसिद्ध केलीय. त्यात अझिम प्रेमजी दुसऱ्या, हिंदुजा बंधू तिसऱ्या तर गौतम अदानी दहाव्या स्थानावर आहेत.
कोण आहेत भारतातले पहिले 10 लक्ष्मीपुत्र?
- – मुकेश अंबानी – 38 अब्ज डॉलर
- – अझिम प्रेमजी -19 अब्ज डॉलर
- – हिंदुजा बंधू – 18.4 अब्ज डॉलर
- – लक्ष्मी मित्तल – 16.5 अब्ज डॉलर
- – पालोनजी मिस्त्री – 16 अब्ज डॉलर
- – गोदरेज कुटुंबीय – 14.2 अब्ज डॉलर
- – शिव नाडर – 13.6 अब्ज डॉलर
- – कुमार बिर्ला – 12.6 अब्ज डॉलर
- – दिलीप संघवी – 12.1 अब्ज डॉलर
- – गौतम अदानी – 11 अब्ज डॉलर