ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / मुंबई दुर्घटना: मनसेच्या ‘संताप’ मोर्चासाठी गर्दी वाढू लागली!

मुंबई दुर्घटना: मनसेच्या ‘संताप’ मोर्चासाठी गर्दी वाढू लागली!

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेनंतर मनसेनं आज, गुरुवारी राज्य सरकारविरोधात ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं आहे. मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्थानक मुख्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नसली तरी मोर्चासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळं या मोर्चाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. मुंबईतील लोकल सेवा सुधारत नाही तोपर्यंत बुलेट ट्रेनची वीटही रचू दिली जाणार नाही, असा त्यांनी इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा निघत आहे. मोर्चासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येनं मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. मनसेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेलाही या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं मुंबईकरही मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.
एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेनंतर मनसेने जाहीर केलेला मोर्चा केवळ पक्ष वा आपल्यापुरता मर्यादित नसून तो आपला सर्वांचा आहे, अशी भूमिका राज यांनी मांडली आहे. देशात एक प्रकारची अघोषित आणीबाणी असून, त्याविरोधात आवाज ठरविला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. या मोर्चामुळे मुंबईतील ७५ लाख प्रवाशांच्या समस्यांना वाचा फुटेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *