ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ थेट पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर!

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ थेट पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर!

नवी दिल्ली। स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ पुन्हा एकदा वादात अडकली आहे. राधे माँने विवेक विहारमधील पोलीस ठाण्यात ‘प्रकट’ झाली. इतकंच नाही तर राधे माँने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसली. इतकंच नाही तर या पोलीस ठाण्याचा अधिकारी संजय शर्मा राधे माँ समोर हात जोडून उभा राहिला.
राधे माँच्या भक्तित लीन झालेल्या या अधिकाऱ्याचा फोटो वायरल झाल्याने पोलीस दलावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. राधे माँसाठी दाखवलेल्या ‘भक्तिभावा’चे वर्तन चुकीचे असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी विशेष पोलीस आयुक्त दिपेंद्र पाठक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस अधिकारी संजय शर्मा यापूर्वीही लाचखोरीच्या आरोपावरून चर्चेत राहिलेला आहे. आता राधे माँला थेट आपल्या खुर्चीवर बसवून तिच्याबद्दल भक्तिभाव दाखवणेही त्याच्या अंगलट आले असून नोकरीवर गदा येऊ शकते.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *