ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ‘RSS’ चा नोंदणी अर्ज धर्मदाय आयुक्तांनी फेटाळला

‘RSS’ चा नोंदणी अर्ज धर्मदाय आयुक्तांनी फेटाळला

नागपूर। ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नावाने संस्था नोंदणी करण्याचा अर्ज धर्मादाय आयुक्तांनी फेटाळून लावला. माजी नगरसेवक संघ नोंदणीकृत नसल्याने जनार्दन मून यांनी ‘राष्ट्रीय स्वंयसेवक संघ’ नावाची दुसरी संघटना स्थापन करून त्यासाठी धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी अर्ज केला होता. धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मून नागपूर खंडपीठाकडे दाद मागणार आहेत.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नावाने नोंदणी करण्याचा अर्ज धर्मादाय आयुक्तालयाने ऑनलाइन अर्ज मंजूर केला असल्याचा दावा जनार्दन मून यांनी केला. राजेंद्र गुंडलवार यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नोंदणी प्रकरणी दाखल केलेल्या अर्जावर आक्षेप घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने या आधीच दिल्ली येथे संघटनेची नोंदणी झाला असल्याचा मुद्दा गुंडलवार यांनी मांडला. त्याशिवाय वसंत बराड आणि प्रशांत कमलाकर बोपर्डीकर यांनीही नावनोंदणीला विरोध केला. कायद्यातील कलमांचा आधार घेत त्यांनी ‘राष्ट्रीय’ या शब्दाचा वापर कोणत्याही स्वयंसेवी संस्थेच्या नावाने नोंदणीकृत करता येणार नाही असा आक्षेप घेत नोंदणी अर्जाला विरोध केला. यामुद्याचा आधार घेत धर्मादाय आयुक्तांनी मून यांचा अर्ज फेटाळून लावला. या निर्णयामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. धर्मादाय आयुक्तांनी दिलेला निर्णय चुकीचा असून त्याविरोधात हायकोर्टाच्या नागूपर खंडपीठात दाद मागणार असल्याचे मून यांनी सांगितले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *