ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / NIAचा हुर्रियत नेत्यांभोवती फास, फुटीरतावाद्यांचा ‘खेळ खल्लास’

NIAचा हुर्रियत नेत्यांभोवती फास, फुटीरतावाद्यांचा ‘खेळ खल्लास’

नवी दिल्ली। काश्मीर खोऱ्यात हिंसाचार, दहशतवाद पसरवण्यासाठी फुटीरतावादी नेत्यांना पाकिस्तानातूनच पैसे पुरवले जात असल्याचे भक्कम पुरावे राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) सापडल्यानं हुर्रियत नेत्यांभोवतीचा फास आता आवळला जाणार आहे. सय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारूक आणि यासीन मलिक हे त्रिकूट चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकतं.
हुर्रियतच्या बड्या नेत्याच्या एका ‘खास’ माणसासह पाच जणांना एनआयएनं मॅजिस्ट्रेटपुढे साक्ष देण्यास तयार केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली आहे. पाकिस्तानातून आलेला पैसा वापरून हुर्रियत नेत्यांनी काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराचा भडका कसा उडवला, याची कहाणी ते कोर्टात सांगणार आहेत. या ‘टेरर फंडिंग’मध्ये दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाचाही हात असल्याचं त्यातून समोर येईल.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादासाठी पैसा कुठून येतो, कसा येतो, कोण पाठवतं, कुणाकडे पाठवतं याचा तपास एनआयए अधिकारी करत होते. त्या दरम्यान त्यांनी काही आरोपींना अटक केली होती. त्यांच्यापैकीच पाच जणांनी सीआरपीसीचे कलम १६४ अन्वये आपली साक्ष नोंदवली आहे. त्यामुळे फुटीरतवाद्यांचा खेळ खल्लास होऊ शकतो.
दरम्यान, या संधीचा उपयोग करून सरकारने हुर्रियत नेत्याशी चर्चा करावी आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचाही वापर करून घ्यावा, असं एका वर्गाला वाटतंय.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *