ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / पाकिस्तानशिवाय काश्मीरवर तोडगा अशक्य: ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा

पाकिस्तानशिवाय काश्मीरवर तोडगा अशक्य: ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा

नवी दिल्ली। देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारचे वाभाडे कारणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपची कोंडी करणारं वक्तव्य केलं आहे. काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढायचा असेल तर पाकिस्तानशी चर्चा करावीच लागेल, असं वक्तव्य सिन्हा यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
‘दि वायर’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत यशवंत सिन्हा यांनी हे वक्तव्य केलं आहे. जम्मू काश्मीरमधील लोक स्वत:ला एकटं समजत आहेत. ही गोष्ट मला वेदना देते. आपण त्यांना भावनिकदृष्टा गमावून बसलो आहोत. हे समजून घेण्यासाठी आपल्याला काश्मीर खोऱ्याचा दौरा केला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. काश्मीर प्रश्न सोडवायचा असेल तर यात दुर्देवाने पाकिस्तान तिसरा पक्ष (थर्ड पार्टी) असेल. या प्रश्नावर अंतिम तोडगा हवा असेल तर पाकिस्तानला त्यात सहभागी करून घ्यावेच लागेल. हो, पण तुम्ही हा प्रश्न आणखी ताणून ठेवू शकत नाही, असंही सिन्हा यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलयं.
नियंत्रण रेषेवरील लोकांना ठार मारलं जात आहे. त्याला पायबंद घातला पाहिजे. कारण तिथे कोणीच युद्ध जिंकत नाहीये. नियंत्रण रेषेच्याबाबतीत जग पाकिस्तान सोबत नाही, तर आपल्या सोबत आहे. तुम्ही नियंत्रण रेषा बदलू शकत नाही. त्यामुळे नियंत्रण रेषेवर शांतता का असू नये? पाकिस्तानशी मतभेद असतानाही नियंत्रण रेषेवर शांती निर्माण होऊ शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 पंतप्रधान वेळच देत नाहीत
काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सिन्हा यांनी दहा महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेळ मागितला होता. पण त्यांना मोदींनी अजूनही वेळ दिलेला नाही. त्यावर सिन्हा यांनी दु:ख व्यक्त केलं. मी दु:खी आहे. निश्चितच मी दु:खी आहे. राजकारणात आल्यापासून राजीव गांधींपासून कोणत्याही पंतप्रधानांनी मला भेटण्यास नकार दिलेला नाही. माझ्याकडे तुम्हाला भेटायला वेळ नाही, असं कोणताच पंतप्रधान मला म्हणालेला नाही. इथे तर माझेच पंतप्रधान आहेत. ते मला वेळ देत नाहीत. आता मला फोन करून बोलावणं आलं तरी मी जाणार नाही. कारण वेळ निघून गेलीय. मला चांगली वागणूक दिलेली नाही, असं सिन्हा यांनी सांगितलं.
जेटलींवर पलटवार
तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये यशवंत सिन्हा यांचे अर्थमंत्रीपद काढून त्यांना परराष्ट्र मंत्री करण्यात आलं होतं. ही त्यांची पदावनती होती, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली होती. त्याबाबत विचारले असता, मग आता सुषमा स्वराज महत्त्वहीन खातं सांभाळत आहेत असं जेटलींना म्हणायचं आहे का?, असा सवालही त्यांनी केला.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *