ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / आमचे सीमोल्लंघन हे जनतेच्या भावनांचा सन्मान करणारे- उद्धव ठाकरे

आमचे सीमोल्लंघन हे जनतेच्या भावनांचा सन्मान करणारे- उद्धव ठाकरे

मुंबई। आमचे सीमोल्लंघन हे जनतेच्या भावनांचा सन्मान करणारे असते. आम्ही मुहूर्ताच्या तारखा ठरवून व समोरच्यांच्या कुंडल्या समोर ठेवून निर्णय घेत नाही आणि राजकारण करीत नाही, असे सांगतानाच आमचे राजकारण खुर्च्यांचे आणि स्वार्थाचे नाही, तर महाराष्ट्रहिताचे आहे. याक्षणी तरी आम्हाला महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण करून घोडेबाजारवाल्यांच्या ‘बुलेट’ मस्तीला प्रोत्साहन द्यायचे नाही. आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत, अशी सारवासारव शिवसेनेने दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून केली आहे.

दसऱ्याचा मुहूर्त साधून शिवसेना भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती. शिवसेनेनेही आम्ही निर्णयाप्रत आल्याचं सांगून या चर्चांना हवा दिली होती. पण दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेने कोणतीही टोकाची भूमिका न घेतल्याने त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. साथ द्यायची ती उघडपणे आणि लाथ घालायची तीदेखील उघडपणे. आमच्याकडे कपट, कारस्थानांना थारा नाही व जनतेला फसवून राज्य भोगण्याचे आमचे धंदे नाहीत. आम्ही काय आहोत हे येणारा काळच ठरवील. सीमोल्लंघन झालेच आहे. ज्यांना ते दिसले नाही त्यांना पोटदुखीचा त्रास आहे. त्यांनी वेळेत उपचार करून घ्यावेत!, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव काय म्हणाले…

> आम्ही आमची भूमिका सर्वच विषयांवर अत्यंत ठामपणे मांडली. त्यातून ज्या कुणाला अर्थ-अनर्थांची चिवडाचिवडी करायची असेल तर त्यांनी ती खुशाल करावी. कुणाला काय वाटते यावर आमची धोरणे ठरवली गेली असती तर शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेचा हा विजयी रथ इथपर्यंत आणताच आला नसता.

> ‘सीमोल्लंघना’चे कसे काय करावे हे इतरांकडून शिकण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही आज सत्तेत जरूर आहोत, पण याचा अर्थ आम्ही त्यांच्या कृपेने श्वास घेत आहोत व त्यांच्या मेहेरबानीने जगत आहोत असा नाही. राजकारणात कुणी कुणाच्या मेहेरबानीने आज तरी जगत नाही व कुणी कुणाचे उपकारही मानत नाही. चांगले काम व उपकार लक्षात ठेवून वागण्याऐवजी ‘विसरा व पुढे जा’ हेच धोरण राजकारणात आज सरसकट स्वीकारले जात आहे. तसे नसते तर लालकृष्ण आडवाणी हे भाजपचे एकेकाळचे कर्तेधर्ते श्वास गुदमरलेल्या अवस्थेत वनवासात गेले नसते आणि त्यांचे मागचे ऋण विसरून भाजपचे आजचे ‘ढोलबडवे’ पुढारी स्वबळाचे देव अंगी घुमवत नाचताना दिसले नसते.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *