ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ओडिशातील हिंदू परिवाराकडून ३५० वर्षापासून मोहरम साजरा

ओडिशातील हिंदू परिवाराकडून ३५० वर्षापासून मोहरम साजरा

भुवनेश्वर। ओडिशामधील एक हिंदू परिवार गेल्या ३५० वर्षापासून दरवर्षी न चुकता मोहरम सण साजरा करतात. यावर्षीही त्यांनी ही परंपरा कायम ठेवत रविवारी मोहरम सण साजरा केला.
संबलपूरमधील मुदीपाडा येथील हा परिवार १६६४ पासून ताजिया बनवत आहेत. पढियारी परिवारातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहरमवेळी ताजिया निघण्याची परंपरा त्यांचे पूर्वज जयदेब पढियारी यांनी सुरू केली होती. ते लग्नाच्या भीतीनं घरातून पळून गेले होते. पळून गेल्यानंतर मक्केत पोहोचले व त्यांच्यावर तेथील संस्कृतीचा प्रभाव पडला. दोन वर्षानंतर ते दोन मुस्लिम विद्वानांसोबत घरी परतले. गावात आल्यानंतर त्यांनी संबलपूरच्या तत्कालीन शासक राज छत्र साईकडून ताजियासह मिरवणूक (जुलूस) काढण्याची परवानगी मागितली.
संबलपूरच्या राजाने जयदेब यांची विनंती मान्य केली व त्यांना मोहरम सण साजरा करण्याची परवानगी दिली. तेव्हापासून पढियारी परिवार दरवर्षी न चुकता मोहरम सण साजरा करीत असल्याचे राजेंद्र पढियारी यांनी सांगितले. पढियारी परिवार कोणाच्याही मदतीविना या कार्यक्रमाचे आयोजन करतात. स्वतः ताजिया बनवून मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी होतात. ‘देशात संबलपूर एकमेव असं ठिकाण आहे जेथे एक हिंदू परिवार ताजियासह मिरवणूक काढतात’, असं अशोक प्रधान म्हणाले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *