ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / अमित शहा म्हणाले…राणे? मै तो गाने सुनने जा रहा हूँ!

अमित शहा म्हणाले…राणे? मै तो गाने सुनने जा रहा हूँ!

नवी दिल्ली : काँग्रेसला उतावीळपणे सोडचिठ्ठी देणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राणेंना भाजपात प्रवेश करण्याऐवजी नवा पक्ष काढण्याचा सल्ला देत पक्षशिस्तीचा डोसही पाजल्याने राणेंची चांगलीच कोंडी झाली आहे. राणेंची बार्गेनिंग पॉवर वाढवू द्यायची नाही, म्हणूनच शहा यांनी राणेंना कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचं सुत्रांनी सांगितलं. जेंव्हा प्रसारमाध्यमांनी ‘राणेजीं का क्या करेंगे?’, असा सवाल शहा यांना केला. तेंव्हा ‘राणे? मैं तो गाने सुनने जा रहा हूँ. आना हैं तो चलो’, असं म्हणत शहा यांनी राणेंचा विषय उडवून लावला. त्यामुळे राणेंना भाजप प्रवेश अजून दूरच असल्याचं चित्र आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना दसऱ्यापूर्वीच आपण राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे राणे हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. भाजपमध्ये प्रवेश निश्चित व्हावा म्हणून राणे काल दिल्लीत दुपारीच पोहचले होते. त्यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास राणे दिल्लीतील भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरी गेले. तिथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. थोड्यावेळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दानवे यांच्या निवासस्थानी आले. मात्र राणेंना पाहिल्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी बैठक असल्याचं सांगत फडणवीस यांनी तिथून काढता पाय घेतल्याचं सुत्रांनी सांगितलं.
त्यानंतर सायंकाळी पावणे आठ वाजता राणे, दानवे आणि पाटील हे तिघेही अमित शहा यांच्या निवास्थानी पोहचले. पण शहा पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधत असल्याने राणेंना सव्वा तास वाट बघत बसावी लागली. पक्ष कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर शहा यांना प्रसारमाध्यमांनी घेरले. राणेजीं का आप क्या करेंगे?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच राणे? मै तो गाने सुनने जा रहा हूँ, आपको आना हैं तो चलो, असं म्हणंत शहा यांनी राणेंचा विषय उडवून लावला. त्यानंतर नऊ वाजता शहा यांनी राणेंना भेट दिली. वीस मिनिटे चर्चाही झाली. पण या चर्चेत राणेंना कोणताही प्रस्ताव देण्याची संधीच शहा यांनी दिली नाही. उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या शिस्तीत न बसणाऱ्यांवर कशी कारवाई होते, हे राणेंना ऐकवले. शहा यांनीही राणेंना कोणताही प्रस्ताव दिला नाही. उलट वेगळा पक्ष किंवा संघटना स्थापन करा. तुमचा एनडीएमध्ये समावेश करू, असा सल्लाच शहा यांनी राणेंना देऊन राणेंची भाजप प्रवेशाची दारे बंद केल्याचं सुत्रांनी सांगितलं.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *