ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / हिंजवडी येथे कॅब चालकाची वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

हिंजवडी येथे कॅब चालकाची वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

पिंपरी: चुकीच्या दिशेने जाणा-या कॅब चालकाने गाडी तेथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या पायावर घालून पोलिसालाच धक्काबुक्की व शिवीगाळ केली. ही घटना काल (गुरुवारी) सकाळी हिंजवडी येथील शिवाजी चौकात घडली.

विद्याधर मधुकर अवताडे (वय. 35 रा. डोणगाव, सोलापूर) असे आरोपीचे नाव असून त्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी वाहतूक पोलीस मल्हारी वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी चौकात नो एन्ट्रीच्या दिशेने कॅब घेऊन जात असताना वाघमारे यांनी त्याला रोखले. अवताडे याने गाडी न थांबवता तशीच पुढे वाघमारे यांच्या डाव्या पायावर घातली. वाघमारे यांनी त्याच्या गाडीला जोरात थाप मारली असता. त्याने गाडी बाजूला घेत वाघमारे यांना आरेरावी करत त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.

याप्रकरणी हिंजवडी पोलीसांनी अवताडे याला अटक केली असून त्याच्यावर सरकारी कर्मच्या-याला मारहाण व सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असा गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *