ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील : भाजप खासदार पटोले

फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील : भाजप खासदार पटोले

मुंबई : तकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी केल्याचा दावा राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार करत असतानाच भंडारा-गोंदियातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मात्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ देण्याऐवजी सरकारने कधीही अंमलात न येणारी कर्जमाफीची योजना तयार केली आहे, अशी घणाघाती टीका पटोले यांनी केली आहे. भाजपच्या योजनेवर पहिल्यांदाच भाजपच्या बड्या नेत्याने घरचा अहेर दिल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत.
नाना पटोले यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. कृषी संकटामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र सरकार त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा ऐतिहासिक निर्णय आहे. पण या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत साशंकता आहे, अशी भीती व्यक्त करतानाच राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची भानगड सरकारने घालून दिली. त्यात अनेक अडचणी येत आहेत. कर्जमाफीवर अनिश्चितता आहे. कर्जमाफीचे अर्ज सादर करण्यास कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर सक्षम आहेत की नाही, याबाबतही सांशकता असल्याचं त्यांनी सांगितलं.
ही कर्जमाफीची योजनाच सदोष असल्याची टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या कर्जाचा लेखाजोखा सरकारकडे आहे. हाच लेखाजोखा बँकांकडेही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरायला सांगण्याचा अट्टाहास का? शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू नये, यासाठीच सरकारचा प्रयत्न दिसतोय, असं प्राथमिकदृष्ट्या तरी दिसतंय, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी पटोले यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली. आपल्याकडे अतिरिक्त वीज आहे, असं बावनकुळे म्हणतात. मग शेतकऱ्यांना केवळ आठ तास आणि मध्यरात्रीच वीज पुरवठा का केला जातो? असा सवालही त्यांनी केला.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *