ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ‘चकमक फेम’ प्रदीप शर्मा यांचं ‘कमबॅक’; पोलीस महासंचालक मुख्यालयात पदभार!

‘चकमक फेम’ प्रदीप शर्मा यांचं ‘कमबॅक’; पोलीस महासंचालक मुख्यालयात पदभार!

मुंबई : गुंडांचा कर्दनकाळ समजले जाणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा एकदा पोलीस सेवेत सामिल झाले आहेत. तब्बल दहा वर्षानंतर त्यांचे पोलीस दलात पुनरागमन झाले आहे. सध्या ते पोलीस महासंचालक मुख्यालयात पदभार स्विकारतील. काही दिवसानंतर त्यांची ठाण्यात बदली केली जाण्याची शक्यता आहे.

प्रदीप शर्मा हे काल पोलीस महासंचालकांना भेटण्यासाठी पोलीस मुख्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी कार्यभार स्विकारला. शर्मा यांनी आतापर्यंत ३१२ एन्काउंटरमध्ये भाग घेतला असून त्यांनी १०० हून अधिक गुंडांचे एन्काउंटर केले आहे. त्यात अंडरवर्ल्डमधील गुंडांसहित लष्कर- ए-तोयबाच्या अतिरेक्यांनाचाही समावेश आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आणि डी. कंपनीच्या इशाऱ्यावर एन्काउंटर करत असल्याचा शर्मा यांच्यावर आरोप झाला होता.

२००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या एन्काउंटरची चौकशी करण्यात आली होती. तेंव्हा हे एन्काउंटर बनावट असल्याचं उघड झालं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसातील १३ अधिकारी आणि पोलिसांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्मांचाही समावेश होता. त्यानंतर २००८ मध्ये त्यांना निलंबितही करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. शर्मा हे १९८३ च्या बॅचचे अधिकारी असून २०२० मध्ये ते निवृत्त होणार आहेत. त्यांची ठाणे जिल्ह्यात बदली होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलीस दलात पुनरागमन झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र त्यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *