ताज़ा खबरे
Home / खेल / हार्दिक पंड्यानं वडिलांना दिलं ‘सरप्राइज गिफ्ट’

हार्दिक पंड्यानं वडिलांना दिलं ‘सरप्राइज गिफ्ट’

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कारकिर्दीतील पहिलं-वहिलं शतक झळकावणारा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानं त्याच्या करिअरला नवी दिशा दाखवणाऱ्या वडिलांचे आभार मानले आहेत. त्यानं वडिलांना एक ‘सरप्राइज गिफ्ट’ देऊन आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे.
हार्दिक पंड्यानं अनेक ट्विट करून आपल्या वडलांना धन्यवाद दिले. क्रिकेटच्या मैदानावरील माझ्या यशाचं सर्व श्रेय माझ्या वडलांना जातं. वडिलांना जीवनातील सर्व आनंद मिळावा, असंही पंड्यानं ट्विट केलं. हार्दिक पंड्यानं त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. यात त्यानं वडलांचे आभार मानत त्यांना एक नवी कोरी कार भेट म्हणून दिली. ‘तुम्ही ज्या कारजवळ उभे आहात त्या कारचे मालक तुम्हीच आहात’, असं म्हणत त्यानं एक सुखद धक्का दिला.
पंड्यानं एकूण चार ट्विट केले. वडिलांच्या चेहऱ्यावर इतका आनंद पाहून खूप बरं वाटतंय. माझा भाऊ कृणालच्या करिअरसाठी वडिलांनी सर्वकाही पणाला लावले. असं करण्यासाठी हिंमत असावी लागते. केवळ आमच्या करिअरसाठी त्यांनी हे सर्व केलं. त्यांनी आमच्यासाठी जे काही केलं त्यासाठी कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत, असंही पंड्या म्हणाला. हे त्यांच्यासाठी छोटे सरप्राइज आहे, असं म्हणत त्यानं वडिलांना एक कार भेट दिली. या सर्व कामात मदत केल्याबद्दल त्यानं भावाचेही आभार मानले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *