ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / नुकसानभरपाई मिळावी म्हणून शाहरूखकडे वितरकांचा पैशासाठी तगादा!

नुकसानभरपाई मिळावी म्हणून शाहरूखकडे वितरकांचा पैशासाठी तगादा!

मुंबई : माणूस कितीही मोठा असो त्याचे ग्रह फिरले तर भलेभले त्याला सोडून जातात. बॉलिवूडचा किंग शाहरूख खानबाबत काहीसे असेच घडत आहे. शाहरूखचा ‘जब हैरी मेट सेजल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटल्याने वितरकांनी त्याच्याकडे नुकसानभरपाई मिळावी म्हणून तगादा लावला आहे. बरं हे वितरक निव्वळ पैसे मागून थांबले नाहीत, तर काही वितरकांनी शाहरूखला मेसेज करून सलमान खानच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.
काही महिन्यापूर्वी सलमान खानचा ‘ट्यूबलाइट’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट फ्लॉप झाल्यावर सलमानने नुकसान भरपाई म्हणून वितरकांना ३२ कोटी रूपये दिले होते. त्यामुळे शाहरूखनेही ‘जब हैरी मेट सेजल’ फ्लॉप झाल्याने आपल्याला नुकसान भरपाई द्यावी असा वितरकांचा आग्रह आहे.
विशेष म्हणजे शाहरूखने या सिनेमाचे सॅटेलाईट, संगीत आणि डिजिटल हक्क विकून भरघोस कमाई केली आहे. यापूर्वी शाहरूखचा ‘दिलवाले’ हा सिनेमा फ्लॉप झाला होता. तेंव्हा त्याने वितरकांना नुकसान भरपाई म्हणून २५ कोटी रूपये दिले होते. ‘अशोका’ आणि ‘पहेली’ च्या अपयशानंतरही शाहरूखने वितरकांना नुकसान भरपाई दिली होती, त्यामुळे वितरकांनी पुन्हा एकदा नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्याच्याकडे तगादा लावला आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *