ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पवना धरणाचे जलपूजन

महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पवना धरणाचे जलपूजन

पिंपरी: पवना धरण येथे आज (मंगळवारी) पिंपरी-चिंचव़डचे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. धरण परिसरात जाऊन स्वहस्ते जलपूजन करणारे ते पिंपरी-चिंचवडचे पहिले महापौर ठरले आहेत.

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, पाणीपुरवठा अधिकारी रामदास तांबे, पवना धरणाचे अभियंता मनोहर खाडे आदी उपस्थित होते.

यंदा समानधारक पावसामुळे पवना धरण 98.29 टक्के भरले आहे. धरणातील उपयुक्त जलसाठा 8.368 टीएमसी आहे. पवना धरण परिसरात एक जूनपासून दोन हजार 350 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तुर्तास हायड्रोगेटद्वारे 1 हजार 377.91 क्युसेकने पाणी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. तर सांडव्यावरुन सोडण्यात येणारे पाणी थांबवण्यात आले आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *