ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / कामशेत बोगद्याजवळ द्रुतगती मार्गावर स्पिरीटचा टँकर उलटला

कामशेत बोगद्याजवळ द्रुतगती मार्गावर स्पिरीटचा टँकर उलटला

पिंपरी: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ आज (मंगळवारी) एक स्पिरीटचा टँकर उलटला. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. यावेळी टँकरमधून होणारी स्पिरिटची गळती आयआरबी व आयएनएसच्या फायर फायटर टीमने त्वरित बंद केल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

कामशेत बोगद्याजवळ आज (मंगळवारी) सकाळी एक स्पिरीटचा (एमएच 04 सीपी 4132) टँकर उलटला. यावेळी टॅँकर मधून स्पिरीटची गळती होत होती. मात्र आयआरबी व आयएनएसच्या फायर फायटर टीमने स्पिरिटवर पाण्याचा फवारा मारून गळती थांबवली. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. या अपघातामुळे सकाळी साडेसात ते साडेनऊ यावेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *