ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / शहराच्या विकासामध्ये अधिकारी व कर्मचा-यांचा मोलाचा वाटा – महापौर काळजे

शहराच्या विकासामध्ये अधिकारी व कर्मचा-यांचा मोलाचा वाटा – महापौर काळजे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासामध्ये अधिकारी व कर्मचा-यांचा मोलाचा वाटा आहे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

पालिका सेवेतून जुलै 2017 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 11 अधिकारी व कर्मचा-यांचा महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सेवा उपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करून सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील कै. मधुकर पवळे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सभागृह नेते एकनाथ पवार, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, कमल घोलप, माधुरी कुलकर्णी, नगरसेवक  केशव घोळवे, उत्तम केंदळे, तुषार हिंगे, तुषार कामठे, मोरेश्वर शेडगे, सचिन चिंचवडे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी अनिल जगदाळे, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी चारुशिला जोशी, नथा मातेरे, बालाजी अय्यंगार आदी उपस्थित होते.

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य लिपिक आनंदा निकाळजे, लिपिक प्रदीप बांदल, आरोग्य कर्मचारी शिला सोत्रा यांचा समावेश आहे. तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्यांमध्ये मुख्य लिपिक उदय टकले, वाहन चालक कैलास कुदळे, आरोग्य कर्मचारी चंपादेवी गुहेर, जयश्री पवार, छाया खैरे, ताराबाई देडगे, माया काटे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले. तर, रमेश भोसले यांनी आभार मानले.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *