ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / पिंपरी पालिकेला लाचखोरीचे ग्रहण; पाच महिन्यात सहा अधिकारी जाळ्यात

पिंपरी पालिकेला लाचखोरीचे ग्रहण; पाच महिन्यात सहा अधिकारी जाळ्यात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचे ग्रहण लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अवघ्या पाच महिन्यात पालिकेच्या सहा अधिकारी व कर्मचा-यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्यामध्ये तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाचाही समावेश आहे.

सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. जनजागरण मेळावे आणि शिबिराच्या माध्यमातून याचे महत्व पटवून दिले जात आहे. त्यानंतरही व्यवस्थेतील भ्रष्टाचार समोर येतच आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 17 फेब्रुवारी 1997 ते 31 जुलै 2017 या कालावधीत तब्बल 22 अधिकारी, कर्मचा-यांना लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.

त्यापैकी 15 अधिकारी, कर्मचारी निर्दोष मुक्त होऊन सेवेत रुजू झाले आहेत. तर, एका अधिका-याला सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. 22 मार्च ते 31 जुलै 2017 या अवघ्या पाच महिन्यात पालिकेतील सहा अधिकारी व कर्मचा-यांना लाच स्वीकाराताना लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबीने) रंगेहाथ पकडले आहेत. यामुळे मात्र पालिकेची प्रतिमा डागाळली जात आहे.

क्रीडा प्रबोधनासाठी जेवण व नाष्टाचे बील पास करून देण्यासाठी तसेच, त्याचा अहवालासाठी पुरवठादाराकडून 20 हजाराची मागणी पालिकेच्या शिक्षण अधिकारी अलका ज्ञानेश्‍वर कांबळे व क्रीडा प्रबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब अंबादास राठोड यांनी केली होती. त्यातील पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना 21 मार्च 2017 रोजी एसीबीने रंगेहाथ पकडले होते.

एका बिल्डरला बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला देण्याकरीता त्याच्याकडून 12 लाखाची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहाय्यक व लघुलेखक राजेंद्र सोपान शिर्के यांना 24 एप्रिल 2017 रोजी एसीबीने पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच रंगेहाथ पकडले होते. थेट आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकालाच लाच स्वीकाराताना तेही पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर पकडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यातच आयुक्तांची दोन दिवसांपूर्वी बदली होती. त्यामुळे यावरून विरोधकांनी तत्कालीन आयुक्तांवर गंभीर आरोप केले होते.

विनापरवाना लावलेले जाहिरात फलक कमी दाखवून दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ‘अ’ प्रभागातील उपद्रव शोध पथकात काम करणारे अजय अशोक सिन्नरकर यांना 27 एप्रिल 2017 रोजी एसीबीने रंगेहाथ पकडले होते. आरोग्य विभागातील कर्मचा-यांकडूनच हजेरी लावण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकाराताना सहाय्यक आरोग्य निरीक्षक तानाजी होनाजी दाते यांना एसीबीने 14 मे 2017 रोजी रंगेहाथ पकडले होते.

पाणीपुरवठा विभागाच्या पाईपलाईन देखभाल व दुरुस्तीच्या केलेल्या कामाची बिले मंजूर करण्यासाठी  ठेकेदाराच्या भाच्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाणीपुरवठा विभागाचे लेखाधिकारी किशोर बाबुराव शिंगे यांना आज (सोमवारी) एसीबीने पालिका मुख्यालयातील कार्यालयातच रंगेहाथ पकडले. गेल्या पाच महिन्या घडलेल्या या घटनांमुळे मात्र पालिकेची प्रतिमा डागाळली जात आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *