ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / नाशिक: मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी

नाशिक: मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी

नाशिक : सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव द्या अशी मागणी करत लासलगावमधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भूमीपूजनाच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते लासलगाव येथे शीतगृहाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केल्यानंतर शेतकऱ्यांनी सभेत घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांनी अचानक घोषणाबाजी सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना खाली बसण्याची विनंती केली. यावेळी नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना खडे बोलही सुनावले. घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज विरून जावा या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. मात्र शेतकऱ्यांनी आपली घोषणाबाजी सुरूच ठेवली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, गिरीश महाजन आणि जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यानच्या काळात शिवडे गावातील शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवला आहे. या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालून निवेदन सादर केले. समृद्धी महामार्गाला विरोध म्हणूनच नाशिकच्या सभेत शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला असल्याचे बालले जात आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *